पुणे

बोराटवाडी खरिपाचे पूर्वनियोजनासाठी बैठक

CD

नीरा नरसिंहपूर, ता.२३ : बोराटवाडी (ता. इंदापूर) येथे खरीप हंगाम २०२४ पूर्वनियोजनासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी जी. पी. सूर्यवंशी यांनी बीज उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया, ऊस पाचट व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी खर्च कमी करून एकात्मिक पीक व्यवस्थापन करावे व आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन केले.
कृषी पर्यवेक्षक एन. डी. बोराटे यांनी डाळिंब फळपीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. किसन मदने सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय पानिव यांनी सेंद्रिय शेतीचा वापर आपल्या पुढील पिढीला निरोगी शेती हस्तांतरित करण्यासाठी किती गरजेचे आहे त्याबद्दल विश्लेषण केले. देशी गाय पाळणे, गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर करून कमीत कमी रासायनिक खतांची विषमुक्त शेती कशी राहील याची आपण दक्षता घेतली पाहिजे, असे नमूद केले. मका पीक व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी श्रीराम शेतकरी बचत गटाचे प्रगतशील शेतकरी तसेच महिला शेतकरी उपस्थित राहिले.

बैठकीस मंडल कृषी अधिकारी जी. पी. सुर्यवंशी, कृषी सहाय्यक अक्षय कुंभार, कृषी सहाय्यक ए. ए. अडसूळ तसेच शेतकरी उपस्थित होते.

04084

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT