पुणे

नीरा नरसिंहपूरमधील रखडेलेली विकासकामे पूर्ण करण्याची मागणी

CD

नीरा नरसिंहपूर, ता. ९ : येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील आठ वर्षांपासून रखडलेली कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना द्याव्यात, अशी मागणी सरपंच अर्चना सरवदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
फडणवीस राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहाच्या दर्शनासाठी नरसिंहपूरला आले असता ग्रामस्थांच्या वतीने सरवदे यांनी निवेदन दिले. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल, विजय शिवतारे, अर्चना सरवदे, दशरथ राऊत, नितीन सरवदे, श्रीमंत ढोले, नरहरी काळे, विठ्ठल देशमुख आदी उपस्थित होते.
फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीर्थक्षेत्र विकास आराखडाअंतर्गत नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) गावासाठी २६० कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यामध्ये बंदिस्त ड्रेनेज लाईन, बंदिस्त विद्युत केबल, गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, पाणी पुरवठा योजना, भक्तनिवास, पोलिस स्टेशन, आरोग्य उपकेंद्र, नद्यांवरील घाट आदी कामांतील काही कामे आठ वर्षांपासून अपूर्ण आहेत. बंदिस्त ड्रेनेज लाइन काम अपूर्ण असल्याने वारंवार बंद होत आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना व ग्रामस्थांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी पुरवठा योजनेचे कामही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. गावातील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरणाचे काम व्यवस्थित झाले नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बंदिस्त लाइट काम पूर्ण असून, सदर ठेकेदार यांनी एका केबलमधून ७-८ ग्राहकांना कनेक्शन दिले आहेत. पावसाळ्यात नागरिकांना त्यापासून जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या अपूर्ण कामांबाबत जिल्हा नियोजन समितीकडे वारंवार पत्र व्यवहार करून समितीकडून कोणत्याही प्रकारचे दखल घेतली जात नाही. त्यामुळे संबंधितांना अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सूचना द्याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

SCROLL FOR NEXT