पुणे

सराटीत पालखीच्या तयारीची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी

CD

नीरा नरसिंहपूर, ता. २५ : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या सराटी मुक्कामी तळाची आणि नीरा नदीतील पादुकांच्या शाही स्नान ठिकाणाला प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांनी भेट देवून पाहणी केली.
याप्रसंगी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोकाटे, सर्कल शेळके, तलाठी लक्ष्मण चव्हाण, ग्रामसेवक अर्जून साळुंखे, कोतवाल मधुकर गायकवाड उपस्थित होते.
पालखी मार्गावरील पुणे जिल्ह्यातील सराटी हे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण आहे. येथे वारकरी मुक्कामाला असतात. त्यासाठी प्रथमच वॉटरप्रुफ शामियाना, वीज, पिण्याचे, वापरावयाचे पाणी, शौचालय, अंघोळीचे पाणी तसेच वारकऱ्यांचे पाय दाबण्यासाठी आणि तपासणी करिता ११० डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब कोकाटे यांनी दिली.
योग्य नियोजन, सुरक्षा व्यवस्थेची योग्य ती काळजी, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय मदत, पिण्याच्या पाण्याचे टँकर व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेचा आढावा प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांनी घेतला. यावर्षी पालखी सोहळ्यास वारकऱ्यांच्या गर्दीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि पालखी सोहळा मंडळ यांनी समन्वय ठेवून शांततेत सोहळा पार पाडण्याचे आवाहन तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी केले.
यावेळी पालखी मुक्कामी तळाची, नीरा नदीवरील पादुकांच्या शाही स्नानाच्या परिसराची आणि मार्गाची पाहणी करून संभाव्य अडचणी संदर्भात सूचना दिल्या. सराटी ग्रामस्थ, वारकरी मंडळींनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT