पुणे

पिंपरी बुद्रूक येथे वाळलेले झाड धोकादायक

CD

नीरा नरसिंहपूर, ता.१६- पिंपरी बुद्रूक (ता. इंदापूर)चे ग्रामदैवत पीरसाहेब दर्गाहजवळ गोंदी रस्त्यालगत वाळलेले झाड गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायकरीत्या उभे आहे. त्यामुळे भक्तांना व वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून जीव जाण्याची वाट पाहत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पिंपरी बुद्रूक ते गोंदी रस्त्या लगत असलेले पीरसाहेब दर्गाहला चिकटून लिंबाचे भले मोठे उंचच्या उंच झाड वाळवी लागल्याने जळून गेले आहे. हे झाड रस्त्याच्या अगदी लगत उभे असल्याने वाहतुकीस धोकादायक होत आहे. तसेच पीरसाहेब दर्गाहजवळच असल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या जिवाला धोका आहे. अनेकदा विविध ठिकाणी अशी झाडे पडल्याने अपघात झालेले आपण पाहिलेले आहेत. दरम्यान, या रस्त्यावर अशाप्रकारची धोकादायक झाडे उभी असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा याबाबत प्रशासनाच्या संबंधित विभागाशी संपर्क साधलेला असतानाही ही धोकादायक झाडे निघत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात पिंपरी बुद्रूक ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ व पदाधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तरीसुद्धा वाळलेले धोकादायक झाड काढण्यात आलेले नाही.


05207

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guinea Landfill Collapse : मुसळधार पावसाचा कहर! कचऱ्याचा डोंगर कोसळला; ३० जणांचा मृत्यू, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली

Akola Ganeshotsav Special Trains: अकोल्यातून कोकण गाठणे सोपे;गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या; नागपूर-मडगाव गाड्यांना थांबा

Pune News : पुण्यात आठ मतदारसंघांत मोठ्या फेरबदलाची शक्यता! तब्बल १४ लाख मतदार वगळणार

Plane Service : पुणे-दिल्ली विमानाला तब्बल सहा तासांचा उशीर

Akola Airport Expansion: विमानतळ विस्ताराला वेग; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू; विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT