नीरा नरसिंहपूर, ता.१० : पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी ३००० भाविकांसाठी ५ हजार पुरणपोळी, ३०० लिटर गुळवणी, ७० लिटर दूध, ११ लिटर तूप, १५ किलोचे भजी, १५ किलो कुरडई पापड, ३५० लिटरची येळवण्याची आमटी तर १५० किलोचा भाताच्या प्रसादाचा आस्वाद घेतला. दरम्यान, सप्ताह काळात ५० हजार भाविकांनी महाप्रसादाचा घेतल्याचे इंदापूर तालुक्यातील एकमेव उदाहरण म्हणावे लागेल.
पिंपरी बुद्रुक येथे श्री गुरुदत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण वाचनाचे पाचव्या वर्षीही यशस्वी आयोजन करण्यात आले. श्रीगुरू दत्त जयंती निमित्त राम महाराज अभंग तर श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर (मळोली) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. अखंड हरिनाम सप्ताह तुकाराम महाराज गाथा पूजन, झेंडा पूजन, विना, टाळ, मृदंग, पूजन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य सोहम महाराज देहूकर यांच्या हस्ते व पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. दररोजच्या दिनक्रमात रोज सकाळी काकडा आरती, दुपारी गाथा भजन, सायंकाळी ४ ते ६ वाजता हरिपाठ व संध्याकाळी नित्यनियमाने ७ ते ९ कीर्तन सेवा व रात्रभर परिसरातील भजनी मंडळींच्या वतीने हरिजागर कार्यक्रम सादर झाला. पिंपरी बुद्रुक येथील भाविक व ग्रामस्थांच्या वतीने दररोजचा चहा, अल्पोहार, महाभोजन, फुले प्रत्येक दिवसाला रोज नित्यनेमाने व्यवस्था व सर्व सुविधांची सोय करण्यात आली होती. दत्तात्रेय नानासाहेब शिंदे बुवांची आठ दिवस स्वयंपाकाची सेवा दिली. सप्ताहाच्या शेवटी ग्रंथाची गावातून ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. महिलांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घालून ठीकठिकाणी स्वागत केले. भाविकांनी फुगड्यांसह विविध खेळ खेळून उत्साह द्विगुणित केला. तर फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
5254
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.