पुणे

लुमेवाडी परिसरातील उसाला तुरे

CD

नीरा नरसिंहपूर, ता. १९ ः लुमेवाडी (ता.इंदापूर) परिसरातील उसाला तुरे येऊ लागल्याने त्याचे वजन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर, साखर उतारा कमी होत असल्याने साखर कारखानेही चिंतेत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा, लोकरी मावा यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच, लोहाची कमतरता भासत असल्याने ऊस पिवळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन-तीन वर्षांपासून उसाला हुमणीचाही प्रादुर्भाव होत आहे. यंदा उसाच्या पिकाला हुमणीचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने अनेक ठिकाणी उसाचे शेत वाळलेले दिसत आहेत. त्यातच उसाला तुरे आल्याचेही दिसते. तुऱ्यामुळे ऊस आतून पोकळ होतो व पर्यायाने उसाचे वजन घटते. शिवाय हे वाढे जनावरे खात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच साखर उतारा कमी होऊन कारखान्यांचे नुकसान होत आहे.
हवेतील आर्द्रता, सातत्याने पडणारा पाऊस, जमिनीत साचलेले पाणी, जमिनीतील नत्राची कमतरता तसेच लहरी हवामान यामुळे उसाला तुरे येतात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तुरे आलेला ऊस उशिरा तुटला व तुटलेल्या उसाचा खोडवा राखल्यास त्याचा ऊसवाढीवर परिणाम होतो. त्यामुळे साखर उताऱ्यात काही प्रमाणात घट येते. तुरा आल्यानंतर उसाची पाने पिवळी व अरुंद होऊ लागतात. पाने पिवळी पडण्यास सुरुवात होते. सध्या इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील उसाला तुरे येऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
उसाला तुरा आल्यावर दोन महिने ऊस पिकावर काहीच परिणाम होत नाही. तोपर्यंत उसाची तोडणी होते. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, असे शेतकी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Salem : सुप्रीम कोर्टाने अबू सालेमला फटकारले, याचिक रद्द करत म्हटले- " टाडा अंतर्गत सजा मिळालीय, समाजाचं भल केलं म्हणून नाही"

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Mobile Discount Offers : वनप्लसच्या प्रीमियम स्मार्टफोनवर चक्क 19 हजारचा डिस्काउंट; OnePlus 15R लाँचनंतर 'इथे' सुरुय मोठी ऑफर

Government Job: RBI मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 650 पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारिख अन् पगार

SCROLL FOR NEXT