पुणे

पिंपरीचा विशाल पहिल्याच प्रयत्नात कृषी मंडल अधिकारी

CD

नीरा नरसिंहपूर, ता. २२ ः पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबातील विशाल वर्धमान बोडके याची पहिल्या प्रयत्नात कृषी मंडल अधिकारी पदावर निवड झाली आहे. गावातील युवकाची कृषी अधिकारी पदावर निवड झाल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशाल याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा २०२४ परीक्षेत राज्यात ९५वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. त्याने लेखी परीक्षेत ४०० पैकी २८५ गुण मिळवले, तर मुलाखतीमध्ये ५० पैकी २८ गुण मिळविले. विशाल याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरी बुद्रुक
येथे माध्यमिक शिक्षण जिजामाता माध्यमिक विद्यालय सराटी, तर सुरुवातीचे शिक्षण श्री शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बावडा येथे झाले. तसेच, सन २०१७ ते २०२१ दरम्यान रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथे पदवीचे शिक्षण घेतले. सन २०२१ ते २०२३ दरम्यान, पदव्युत्तर पदवी (एमएससी ॲग्री) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून वनस्पती रोगशास्त्र विषयात प्राप्त केली आहे.

वडील पोलिस पाटील म्हणून शासनाची सेवा करताना जवळून पाहिले आहे. त्यामुळे शासकीय सेवेत अधिकारी होऊन पिंपरी बुद्रुक ग्रामस्थ, तालुका व जिल्ह्याची सेवा करण्याचा मानस धरत प्रयत्न केला. त्यामध्ये यश आले. एवढ्यावर न थांबता तालुका व जिल्हा कृषी अधिकारी होण्याचा मानस आहे. शिक्षक, मित्र, वडील, आई, आजी, आजोबा, चुलता, चुलती व भाऊ यांनी याकामात मला प्रेरणा मिळाल्याने यश मिळाले आहे.
- विशाल बोडके

05365

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT