पुणे

नरसिंहपुरात गव्हाच्या शेतांवर सोन्याची झालर

CD

नरसिंहपूर, ता. ११ : नरसिंहपूर (ता. इंदापूर) परिसरातील पोषक वातावरणामुळे यंदा गव्हाचे पीक जोमात बहरले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सध्या गहू काढणीस सुरुवात झाली आहे. शेतातील गव्हाच्या पिकाकडे बघितले असता शेतात सोन्याची झालर पसरल्याचे सुखद चित्र पहावयास मिळत आहे. मात्र, उत्पादन वाढून आवक वाढल्यास बाजारभाव घसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना यंदा बाजारभाव वाढण्याची अपेक्षा आहे. नीरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यात उसाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लोकवन, २१८९ आणि महाबीज यांसारख्या गव्हाच्या वाणांना पसंती दिली. मुबलक पाणी आणि कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाची वाढ उत्तम झाली आहे. सध्या काढणीचा हंगाम सुरू होत आहे. मजूरटंचाईमुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरच्या साहाय्याने काढणी करण्यावर भर देत आहेत.

गेल्या वर्षी गव्हाचा तुटवडा असल्याने दर ३५०० ते ४५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. यंदा उत्पादन वाढल्याने दर कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाजारात सेंद्रिय व जैविक पद्धतीने पिकवलेल्या गव्हाला ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.

इंदापूर तालुका उसाचे आगार म्हणून प्रसिद्ध असले तरी ज्वारी, गहू, हरभरा, केळी, डाळिंब, पेरू आदी पिकांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नीरा व भामा नद्यांच्या परिसरात पाण्यामुळे बऱ्यापैकी उसाचे पीक घेतले जाते.

05375सिझ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT