पुणे

श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

CD

नीरा नरसिंहपूर, ता. २४ ः शिखर शिंगणापूर (जि. सातारा) येथील महादेवाच्या चैत्र महिन्यातील यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी छत्रपतींचे वंशज राजेभोसले कुटुंबीयांच्यावतीने महादेवाची महापूजा होऊन यात्रेला सुरुवात झाली. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व कर्नाटक राज्यातून मानाच्या कावडी, धजी व काट्यासह लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच मानाच्या कावडी, धजींची भेट यात्रेदिवशी शंभो महादेव- शंभो महादेव गजरात होत असते.
हर हर महादेवच्या जयघोषात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आपल्या मानाच्या कावडी व धजी घेवून गुढी पाडव्यापासून पायी चालत शिंगणापूरच्या दिशेने चालले आहेत. यामध्ये गंगाखेड, परभणी, अंबेजोगाई, परळी, बीड, गेवराई, मंगरुळ, उस्मानाबाद, लातूर, औसा, केज बरोबर विदर्भ, मराठवाड्यातील गावा गावातून महिला, पुरुष व अबालवृद्ध भाविक दररोज जवळपास ४५ ते ५० किलोमीटर पायी चालत आहेत. शुक्रवारी (ता. २७) एकादशीनिमित्त महादेवाची महापूजा करण्यात येते. त्याचदिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठी यात्रा भरते.
पायी चालत चाललेल्या भाविकांना गावो गावच्या नागरिकांच्यावतीने सरबत, चहा, नाष्टा, जेवणावळी देवून सेवा केली जाते. नरसिंहपूर येथील नीरा भीमा नद्यांच्या पवित्र संगमावर सर्रास भाविक अंघोळी करून इंदापूर तालुक्यात प्रवेश करून नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा, वालचंदनगर मार्गे फलटण तालुक्यात प्रवेश करून शिखर शिंगणापूरला दर्शनास हजेरी लावतात.
टणू गणेशवाडी, शिंदेवस्ती, बावडा, लाखेवाडी, रेडणी, निमसाखर गावातून जाणाऱ्या भक्तांच्या चहा, नाष्टा, सरबताची सोय करण्यात आली आहे. तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. पिंपरी बुद्रुक येथे लोकनेते कै. महादेवराव बोडके दादा व ग्रामस्थांच्यावतीने मराठवाड्यातून येणाऱ्या विलास ढवाण यांच्या मानाच्या धजीला परंपरेप्रमाणे भाविकांकडून जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच परभणी जिल्ह्यातील कोदरी येथील २०० वर्षांपूर्वीची जुनी मानाच्या कावडीला तर लातूर जिल्ह्यातील घोणसी येथील २१ वर्षांपूर्वीच्या जुन्या कावडीला शंकर व शहाजी बोडके कुटुंबियांच्यावतीने जेवणाची सोय केली होती.
परभणी जिल्ह्यातील कोदरी येथील २०० वर्षांपूर्वीची जुन्या मानाच्या कावडीला शिखर शिंगणापूर देवस्थानच्या वतीने ७२ हजार कावडी व ५००० काट्या पैकी एकादशी दिवशी धजाचा मान असतो असे माणिक प्रभाकर एकपट्टे महाराज यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT