पुणे

येडगाव येथील तारेचे कुंपण ओतूर वनविभागाने हटविले

CD

ओतूर, ता. १४ : ओतूर (ता.जुन्नर) येथील वनविभागाने येडगाव येथील श्याम्पियन कंपनीने २०१८ मध्ये वनक्षेत्रात केलेले बेकायदेशीर तारेचे कुंपण शनिवारी (ता.१२) काढून टाकले. अशी माहिती माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येडगाव येथील श्याम्पियन कंपनीने फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर ४२ मधील राखीव वनक्षेत्रात तारेचे कुंपण केले होते. त्याबाबात वनविभागाकडून वन गुन्हा येडगाव येथे नोंदविलेला होता. यासंबंधी सदर राखीव वनक्षेत्रात जाऊन साधारण एक हेक्टरमध्ये जवळ जवळ २५० ते ३०० मीटर लांबीचे अवैध तारेचे कुंपण शनिवारी जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकले.
वनविभागाकडून ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ, उपसरपंच अजय नेहरकर, माजी सरपंच हर्षल गावडे, वनपाल संतोष साळुंके, वनरक्षक विशाल गुंड, वनरक्षक महेश जगधने, वनसेवक बाळू वामन व रेस्क्यू टिम सदस्य रोशन भोर, संतोष कुतळ, सोमनाथ भालेराव यांनी केली.

00064

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT