पुणे

टोलच्या माफीसाठी डुंबरवाडीत ठिय्या

CD

ओतूर, ता. १ : डुंबरवाडी (ता.जुन्नर) येथील अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील टोल नाक्यावरील टोल वसुली जुन्नर तालुक्यातील वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक वाहनचालकांना टोलमध्ये सूट मिळावी, या मागणीसाठी
रविवारी (ता.१) दुपारी येथे नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.
आतापर्यंत डुंबरवाडी टोल नाक्यावर स्थानिकांना सूट दिली जात होती. मात्र, नुकताच एनएसजी प्रा.लि.या कंपनीने टोलनाकाचा ठेका टोल वसुलीसाठी घेतला आहे. कंपनीच्या टोल प्रशासनाकडून एक जूनपासून स्थानिक वाहनांना ३५० रुपयांचा पास सक्तीचा केला आहे. माल वाहतूक वाहनांसाठी हा पास अंदाजे सहा हजार पाचशे रुपयापर्यंत असल्याची माहिती वाहन चालकांनी दिली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी ओतूरमधील नागरिंकासह डुंबरवाडी टोल नाक्यावर टोल प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य मोहीम ढमाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मनसे उपजिल्हा प्रमुख मकरंद पाटे यांनी ही कार्यकर्त्यासह डुंबरवाडी टोल नाक्यावर टोल प्रशासनाच्या विरोधात आंदोलनात केले.
यावेळी येथे जयसिंग तांबे, सोमनाथ टिकेकर, देविदास तांबे, सदा नलावडे जालिंदर पानसरे, पप्पू डुंबरे, रवी चाळक आदी तरुण वाहनचालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांची एकच मागणी होती की, जुन्नर तालुक्यातील वाहन चालकांना आधारकार्ड दाखविल्यावर टोलमध्ये सूट द्यावी. तसेच मासिक पासची अट रद्द करावी. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एल जी थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

00266

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT