ओतूर, ता. ६ : माळशेज घाट रविवारी (ता. जुन्नर) वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांच्या गर्दी फुलला. घाट मार्गावरील हॉटेल व छोटे व्यवसाय गर्दीमुळे बहरले आहेत.
पुणे, नगर व ठाणे या तीन जिल्हातील सीमारेषेवरील सह्याद्रीच्या पर्वत रांगात अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या विविध वनस्पती, नानाजातीचे प्राणी, पक्षू ,पक्षी, हजारो फूट उंच डोंगर कड्यावरून पडणारे पाण्याचे धबधबे यामुळे नेहमीच निसर्ग प्रेमी, वनस्पती संशोधक, वर्षाविहार करणारे, वन्यजीव अभ्यासक याच्या साठी माळशेजघाट व परिसर एक पर्वणीच ठरला आहे.
सध्या माळशेज घाटात पुणे, नगर, मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी, नगर, संगमनेर, जुन्नर, नाशिक तसेच सर्वच राज्यभरातून व राज्याबाहेरचे ही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे वर्षाविहारासाठी येतात.
माळशेज घाटात दररोज होत असलेली पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. जुन्नर तालुक्यातील मढ, खुबी, करंजाळे व इतर गावातील युवक तसेच घाटा खालील मोरोशी, सावरणे, टोकावडे व इतर जवळील गावातील तरुण माळशेज घाटात पावसाळ्यात येथे बोगद्या जवळ व धबधब्या जवळ तात्पुरती निवारा शेड उभी करून त्यात गरम वडापाव, भजी, चहा, कॉफी, मॅगी, भाजून व उकळू मक्याची कणसे, आमलेट पाव, भूर्जी व इतर पॅकिंग मधील पदार्थ विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवत आहे. तसेच अडचणीच्या काळात येथील टपरी व्यावसायिक पर्यटकासह प्रशासनाला ही मदत करता. एकूणच माळशेज घाटात वर्षा विहार करण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून त्यामुळे येथे छोटे व्यवसायही बहरू लागले आहेत. तर माळशेज घाटा परिसरासह जुन्नर तालुका हद्दीतील खुबी, करंजाळे, मढ, सितेवाडी, पारगाव फाटा, खिरेश्वर या आणि पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भिंतीजवळील हॉटेल्समध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
00390
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.