पुणे

स्वतःमधील दोष सुधारणे हीच खरी प्रगती

CD

ओतूर, ता. १७ : मोबाइलचा सकारात्मक वापर करूनही करिअर घडविता येते, परंतु त्याचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी स्पर्धा महत्त्वाची आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वतःमधील दोष ओळखून त्यात सुधारणा करणे. हीच खरी प्रगतीची दिशा आहे,’’ असे प्रतिपादन योगेश महाराज नागरे यांनी केले.
गडवाट प्रवास सह्याद्री या संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त ‘एक पाऊल भविष्याच्या वाटेवर’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. गुरुवारी (ता. १७) झालेल्या या कार्यक्रमात नागरे महाराज यांनी गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना समतोल विचारसरणी व प्रेरणादायी उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवी चेतना निर्माण केली.
राहीबाई पोपेरे यांचे उदाहरण देताना नागरे महाराज यांनी सांगितले की, फक्त ६५ वर्षांचे वय असूनही बीजसंकलनातील त्यांच्या कार्याची दखल घेत देशाने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बालवयातच स्वराज्यनिर्मितीचे स्वप्न पाहिले होते. आपणही आपल्या व्यवसायावर निरपेक्ष प्रेम केले पाहिजे. शाळा म्हणजे दुसरी आई आहे, तिच्यावरही तेवढेच प्रेम असले पाहिजे. शालेय वयात मुलांनी वाचनसंस्कृती जोपासत समाजप्रबोधनाचे कार्य केले पाहिजे आणि संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा व सेवाभावाचा संदेश सर्वदूर पोहोचविला पाहिजे.
गडवाट ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून दुर्गसंवर्धन, शिवजयंती महोत्सव, ग्रामीण भागातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, किल्ला कसा पाहावा, आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे. या वर्षी विविध शाळांमध्ये प्रबोधनपर सत्रांचे आयोजन संस्थेने केलेले आहे. याचाच एक भाग म्हणून वर्धापन दिनानिमित्त संस्थेने हे व्याख्यान आयोजित केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बाबूलाल थोरात होते, तसेच मुख्याध्यापक संपत माने, प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सुमन घाडगे, पर्यवेक्षक कैलास महाजन, प्रदीप कुमार मिरगे, रामदास बगाड, मनीषा ठाकरे, प्रकाश मोधे उपस्थित होते. राजू ठोकळ यांनी सूत्रसंचालन केले. सुनील खुपसे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरांतील अनेक भागांत आज पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागांना मोठा फटका

Dharashiv Accident: देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा मृत्यू; चालकाचे नियंत्रण सुटून पारगावजवळ अपघात,दोघे जखमी, दोन्ही मृत

Arey Ware Beach Drowning : खवळलेल्या समुद्रात पोहणं जिवावर बेतलं, आरे वारे बीचवर चौघांचा बुडून मृत्यू; पती-पत्नीसह दोन बहिणींचा समावेश

Nanded News: शिपायाच्या नोकरीसाठी लेकीची विक्री; तिसऱ्या अपत्याची अडचण नको म्हणून पित्याचे कृत्य, आईकडून आठ वर्षांनंतर तक्रार

Madha Crime : धक्कादायक! दहा वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; चाकू, दगडाने ठेचून खून, नरबळीचा संशय?

SCROLL FOR NEXT