पुणे

मद्यधुंद वाहन चालकांवर ओतूर पोलिसांची कारवाई

CD

ओतूर, ता. ३० ः ओतूर (ता. जुन्नर) येथील पोलिसांनी कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर दारू पिऊन वाहन चालविताना नाकाबंदी दरम्यान आढळून आलेल्या वाहन चालकांवर कारवाई केली आहे.
या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. धनराज कैलास ढगे (वय ३२, रा. ओतूर, ता. जुन्नर), प्रथमेश अरुण कुटे (वय २७, रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर) हे दोघे दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या दाखल केलेल्या गुन्ह्याच्या दोषारोप पत्रांसह जुन्नर न्यायालय येथे मंगळवारी (ता. २९) दोघांना हजर केले असता, जुन्नर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार यांनी आरोपींना प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ही कारवाई ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमणे, पोलिस हवालदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, पोलिस अंमलदार श्याम जायभाये, किशोर बर्डे, कोर्ट कारकून अतुल भेके, सरकारी वकील अनुप लखोटीया यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind vs Pak Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; पायक्रॉफ्ट सामनाधिकारी म्हणून कायम राहणार?

H1 B Visa : ८८ लाख दरवर्षी भरायचे? कुणाला अन् कधीपासून नवे नियम लागू? अमेरिकेनं दिलं स्पष्टीकरण, व्हिसाधारकांना मोठा दिलासा

Pitru Paksha 2025: पितृ पक्षात स्वप्नात पूर्वज दिसतायत? जाणून घ्या त्यामागचा दैवी संदेश

Kolhapur Agriculture Economy : ‘कृषिसंपन्न कोल्हापूरचे अर्थकारण शेती व शेतीपूरक व्यवसायांवरच अवलंबून', लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा...

Asia Cup 2025 : पाकचा उलटवार उधळण्याची तयारी; सलग दुसऱ्यांदा पराभव करण्यास भारतीय संघ सज्ज...

SCROLL FOR NEXT