पुणे

रोहोकडीत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

CD

ओतूर, ता. १७ : रोहोकडी (ता. जुन्नर) येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची गावातून ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात भारतमाता व क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रध्वजाचे पूजन करून सरपंच सुभाष घोलप यांनी ध्वजवंदन केले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणेश घोलप, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडी येथे महेश घोलप यांनी ध्वजवंदन केले. शाळेतील आयोजित सभेत अध्यक्षस्थानी गुलाब थोरात होते. यावेळी स्वातंत्र्य दिनावर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते व भाषणे सादर केली. येथील आदर्श शिक्षक अविनाश खंडू घोलप यांच्यावतीने विद्यार्थ्यांना दहा डझन २०० पेजेस फुलस्केप वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच सुदाम घोलप, भगवान घोलप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज घोलप, सचिन घोलप, उषा घोलप, सरपंच सुभाष घोलप, उपसरपंच लता केदारी, सदस्य प्राची मुरादे, निवृत्त पोलिस अधिकारी दत्तात्रेय मुरादे, दामोदर घोलप, मार्तंड घोलप, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष नवनाथ घोलप, नवनाथ मुरादे, सचिन घोलप, अमोल घोलप, शिवशंकर घोलप, पोलिस पाटील विश्वजीत घोलप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT