ओतूर, ता.२४ : जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये माळशेज घाट, हरिचंदगड, कोपरे, मांडावे, मुथाळणे, चिल्हेविडी, पाचघर, आंबेगव्हाण परिसरातील डोंगर दऱ्यांमध्ये आरोग्यदायी तसेच शक्तीवर्धक रानभाज्या व औषधी वनस्पती कंदमुळांचे संकलन करण्यात आदिवासी बांधव सध्या व्यग्र आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वसामान्य नागरिकही रानभाज्यांची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध होत आहे.
प्रत्येक रानभाजी ही वेगवेगळ्या कालखंडात जंगलात उगत असून, ऋतुमानामानुसार आदिवासी बांधव रानभाज्या गोळा करून खातातच. एककवीसाव्या शतकातील विषमुक्त शेती चळवळीला रानभाजी ही एक सशक्त आधार असून, त्यामुळे रानभाज्याना मागणी वाढली आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका असल्याने विविध भागातील व देशातील पर्यटक जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी येतात. त्यांना ही जुन्नरच्या खाद्य संस्कृतीचे आकर्षक असून काही भागात हॉटेल व्यवसाय त्यांना जेवणासाठी या रानभाज्या उपलब्ध करून देतात.
जुन्नर तालुक्यात हदग्याची फुले, बदडा, कोळू, चाईचा बार, कुरहू, कोराळ, आंबाडी, भारंगी, करटुले, उतरण, काटवल, मालकामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, केना, कोंबडा, तरोटा, धानभाजी, टेकोडे, ढेमाणी, पकानवेल, भशेल पानवेल, काळा पेठारा, पांढरा पेठारा, बांबूवाष्टे, भराटी, मटारू, राजगिरा, रानआल, रानकोचई, रानमटाळू, वाघोटी, आंबुशी, चिवळ, तांदुळजा, माठ, पाथरी, घोळ, सराटे, टाकळा, भुईआवळी, कपाळफोडी, कानफुटी,आंबट पाचुका,घायपात फुले अशा प्रकारचे विविध रानभाज्या वेगवेगळ्या महिन्यात डोंगर दऱ्यात नैसर्गिकरित्या उगतात.
ओतूर येथील शांताराम वारे हे गेल्या सहा वर्षांपासून स्थानिक स्वतः रानभाज्या गोळा करत आहेत. इतर आदिवासी तरुण व महिलाही रानभाज्या गोळा करण्यास प्रवृत्त करून महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रदर्शनात स्टॉल लावून काही भाज्या तयार करून तर काही भाज्याची बनवण्याची पद्धतीची माहिती नागरिकांना देवून भाज्यांची विक्री करतात.
व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे
जुन्नर तालुक्यातील डोंगराळ भागात व जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक रानभाज्या उगवत असतात. जाणकार आदिवासी बांधव व महिला त्या गोळा करण्याचे काम करतात. प्रत्येक मोसमामध्ये रानभाज्या त्यामुळे उपलब्ध होतात. शासनाने कृषी विभागामार्फत बचत गटांना रानभाज्या विक्रीसाठी ठोस व्यवस्था तयार करून देणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक प्रदर्शनात रानभाज्यांपासून तयार होणारे पदार्थ व भाज्या विक्रीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत शांताराम वारे यांनी व्यक्त केले आहे.
00626, 00627, 00628
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.