पुणे

ओतूरच्या चैतन्य विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

CD

ओतूर, ता. २३ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात विद्या विद्यापीठ संगमनेर, व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट आणि ग्रामविकास मंडळ यांनी संयुक्तपणे २७० विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्सचे आयोजन केले होते. ग्रामविकास मंडळाचे अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
या प्रसंगी प्राध्यापक राहुल कुमार मिश्रा यांनी दहावीला शंभर टक्के गुण कसे मिळतील त्याचबरोबर बारावीनंतरच्या असणाऱ्या स्पर्धा परीक्षांबाबत माहिती दिली. आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की,‘‘निव्वळ गृहपाठ लिहिणे म्हणजे अभ्यास नाही. ‘रीड मच, थिंक मोर’ असा अभ्यास करावा. स्वयं अध्ययन, तज्ज्ञांची मदत आणि सतत वाचन, लेखनाचा सराव यावर विद्यार्थ्यांनी भर देणे गरजेचे आहे. आत्मविश्‍वास, स्वयंप्रेरणा यांद्वारे आपण यशापर्यंत पोहचू शकतो. "स्टार्ट अर्ली, फिनिश अर्ली" या उक्तीनुसार वेगळ्या पद्धतीने आपण आपला मुद्दा मांडला पाहिजे. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. नोव्हेंबर पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे.’’ त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज, जनरल स्टडी याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. ‘मुझे नही पता की जीत मेरी होगी, पर इतना पता है मुझे कि मै हारुंगा नही’, अशी प्रेरणाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सीइटी, नीट, आयआयटी जेईई इत्यादी परीक्षांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट आणि विद्या विद्यापीठाचे संस्थापक डॉ. नामदेव गुंजाळ, व्हिजनचे सेंटर हेड प्रा. राहुल कुमार मिश्रा, प्रा. सुनिल पांडव, प्रभाकर तांबे, पंकज घोलप, अनिल उकिरडे, भगवंत घोडे, बाळासाहेब साबळे, मंगेश तांबे, देवचंद नेहे, अजित डांगे, ईश्वर ढमाले, अरविंद आंबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी केले. अजित डांगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ACB Raid : 'खुशाल' जगण्याचा हव्यास, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर रेड; मूळ संपत्तीपेक्षा ७६ टक्के संपत्ती कमावली

Stock Market Updates: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 25,100च्या जवळ, कोणत्या शेअर्समध्ये विक्री?

Latest Marathi News Live Update : डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय 'सिरप' विक्री करू नये, अन्न व औषधी विभागाच्या सुचना

Diwali 2025: दिवाळीला घरात अजिबात ठेवू नका 'या' वस्तू, नाहीतर वर्षभर जाणवेल पैशांची चणचण

Tata Capital IPO: टाटा कॅपिटलच्या IPOमध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस; IPO 'ब्लॉकबस्टर' ठरणार का?

SCROLL FOR NEXT