
कोल्हापुरात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights Summary)
भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल: भारत राखीव बटालियन क्रमांक तीनचे तत्कालीन समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे आणि पत्नी हेमांगी सपकाळे यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
७६ टक्के अपसंपदा उघड: सपकाळे दांपत्याच्या नावे ज्ञात उत्पन्नापेक्षा एक कोटी ६६ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न.
राज्यभर मालमत्ता आढळली: मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात जमीन, घर, फ्लॅट आणि मोटारींची नोंद; घराची झडती सुरू असून तपास पुणे परिक्षेत्राचे अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले करीत आहेत.
Kolhapur ACB News : भारत राखीव बटालियन क्रमांक तीनचे तत्कालीन समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे (वय ६०, रा. मरोशी भवानीनगर, मरोळ, मुंबई) यांच्यासह पत्नी हेमांगी सपकाळे यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आज गुन्हा दाखल झाला. सपकाळ दांपत्याच्या नावे ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा एक कोटी ६६ लाख ११ हजार रुपयांची म्हणजेच ७६ टक्के अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत २०१८ मध्ये लाचप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरच त्यांची चौकशी सुरू झाली होती.