पुणे

प्रा. डॉ. सुनील खताळ यांना पुरस्कार प्रदान

CD

ओतूर, ता. २८ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संगणक विभागप्रमुख डॉ. सुनील सुदाम खताळ यांना सांगली येथे शनिवारी (ता. २३) ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार २०२५ खासदार विशाल पाटील, आमदार इद्रीस नायकवडी तसेच माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विशेष उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून डॉ. खताळ यांची साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार २०२५ साठी निवड केली असून ते कार्यरत असलेल्या क्षेत्रात त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. प्रा. डॉ. खताळ हे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे गेले बारा वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे संगणक अभियांत्रिकी विभागात बहुमूल्य योगदान आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुस्तके देखील आहेत. त्यांच्या कार्याची व्याप्ती ही शैक्षणिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन सामाजिक भाव ठेवणारी आहे. या कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार डॉ. खताळ यांना प्रदान केला.
साहित्यरत्न पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यु. खरात सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT