पुणे

ओतूरच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

CD

ओतूर, ता. १६ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन केले होते. यात ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयाच्या ७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या स्पर्धा सोमवार (ता. १३) व मंगळवारी (ता. १४) श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी (पुणे) या ठिकाणी पार पडल्या. या विद्यार्थ्यांची २६ व २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर व क्रीडा विभाग प्रमुख अमित झरेकर यांनी दिली.
सर्व यशस्वी खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक झरेकर, कुणाल हुलवळे यांचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघूनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, आत्माराम गाढवे, रोहीदास घुले, अमोल डुंबरे, नितीन तांबे, सीताराम डुंबरे, संजय वल्हवणकर, राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिरडे, अजित डांगे यांनी अभिनंदन केले.

विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू -
१४ वर्षे वयोगट : मुली - शर्वरी जगताप (लांब उडी - प्रथम क्रमांक).
१७ वर्ष वयोगट : मुले - प्रदीप पोगाके (५ किलोमीटर चालणे - द्वितीय क्रमांक).
१९ वर्षे वयोगट : मुली - वैष्णवी ठिकेकर (३००० मी धावणे, ४ कि.मी. क्रॉसकंट्री- प्रथम क्रमांक, १५०० मी. धावणे - द्वितीय क्रमांक,
८oo मी धावणे - तृतीय क्रमांक ), नेहा फापाळे (४ कि.मी. क्रॉसकंट्री - तृतीय क्रमांक). राजेश्वरी पवार (३ किलोमीटर चालणे - प्रथम क्रमांक), अनुश्री पानसरे (३ किलोमीटर चालणे - द्वितीय क्रमांक), वेदिका भाईक (तिहेरी उडी - तृतीय क्रमांक).

00915

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump New Tariffs : ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतासह १६ देश अमेरिकेच्या निशाण्यावर, व्यापार कराराला धक्का बसण्याची शक्यता

Vijay Government Takes Action: विजय सरकारची आमदाराविरुद्ध कारवाई; महिला जिल्हाधिकाऱ्यांना अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा

Maharashtra Education News: मोठा निर्णय! आता ‘खासगी’ शाळांमध्ये लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश; खासगी शाळांची थांबणार मनमानी; प्रवेशासाठी वयोमर्यादाही निश्चित

Latest Marathi News Live Update : पुण्यात सराईत महिलेकडून ६०० ग्राम गांजा जप्त

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची आणखी दोन स्थानके आजपासून प्रवाशांसाठी खुली, प्रवाशांसाठी मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT