पुणे

दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

CD

ओतूर, ता.२५ : ओतूर (ता.जुन्नर) परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दिवाळी होऊन सुद्धा कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत नाही. त्यामुळे त्याच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यात चाळीत साठवणूक केलेला कांदा प्रतिकूल हवामानामुळे खराब होत आहे. कांदा सडण्याच्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आहेत.

दिवाळीनंतर ओतूर, उदापूर, डिंगोरे, नेतवड, माळवाडी, चिल्हेवाडी, पाचघर, पिंपळगाव जोगा, रोहोकडी व इतर परिसरात उत्तम प्रतीचा कांदा मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत शिल्लक आहे. या परिसरात सध्या कांदा बी उत्पादक करणारे शेतकरी, व्यापारी व कंपन्यांची शेतकऱ्यांच्या चाळीवर कांदे खरेदी सुरू आहे.चालू बाजारभावापेक्षा किलोला दोन ते तीन रुपये चांगल्या कांद्याला बाजारभाव वाढून देतात. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे कांदा खराब मोठ्या प्रमाणावर झाला आहे .तसेच कांदा बियाण्यासाठी कांदा खरेदी करताना भुगी व बदला ते घेत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कांद्याच्या बाजारभावात दसरा ते दिवाळी दरम्यान दरवर्षी वाढ होत असते. त्यामुळे शेतकरी कांद्याची चाळीत साठवणूक करतो. मात्र, यंदा दसरा ते दिवाळी दरम्यान कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
यंदा हवामान एवढे खराब झाले होते, की सकाळी थंडी व धुके, दुपारी, कडाक्याचे ऊन तसेच सायंकाळी पाऊस असे कित्येक दिवस खराब हवामान असल्यामुळे चाळीत साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे तर कांदे गॅस पकडून काळे पडू लागले आणि काजळी धरू लागले असल्याने कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. त्यातच बाजारभाव कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कांदे खराब होणे आणि बाजारभाव ही कमी असणे अशा दुहेरी संकटात सापडला आहे.

समाधानकारक बाजारभाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत साठवणूक केला. मात्र दिवाळी होऊन ही कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली नाही. त्यातच कांदा खराब ही मोठ्या प्रमाणात झाला असल्याने कांद्याचा उत्पादन खर्चसुद्धा हाती येत नाही. तरी सरकारने ओल्या कांद्यास ३० रुपये प्रतिकिलो व चाळीत साठवणूक केल्या कांद्यास ५० रुपये प्रतिकिलो हमीभाव जाहीर करावा. तसेच यावर्षी विक्री केलेल्या कांद्याला किलो मागे दहा रुपये अनुदान जाहीर करावे.
- बाळासाहेब ढमाले, कांदा उत्पादक

00949

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप आमदार करणार तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप

Indigo Flight Update : 'इंडिगो'कंपनी ग्राहकांसमोर गुडघे टेकली,९५ टक्के उड्डाणे सुरळीत असल्याचा दावा; पुढची योजनाही सांगितली

Latest Marathi News Update : मध्यप्रदेशात १० नक्षलवाद्यांचेआत्मसमर्पण

Sakal Suhana Swasthyam : महाविद्या आपल्याच भावनांचे विश्‍व : सीमा आनंद

Maharashtra Assembly Winter Session : आमदारांचं भव्य स्वागत, फुलांच्या रांगोळ्या अन् पुष्पकमान; कँटिनमध्ये खास वऱ्हाडी पदार्थांची मेजवानी...

SCROLL FOR NEXT