पुणे

ओतूर येथे ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम

CD

ओतूर, ता. १४ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्राम विकास मंडळ संचलित गेली २३ वर्ष शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सातत्यपूर्ण सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांसाठी विद्यालयाचा हा उपक्रम मार्गदर्शक ठरला आहे. येथील विद्यालयात ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या सहविचार सभेचे आयोजन केले होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर माहिती देताना म्हणाल्या की, ‘‘दरवर्षी या सहविचार सभा संध्याकाळी वाड्या-वस्त्यांवर पालकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन आयोजित केल्या जातात. मात्र, परिसरात बिबट्यांचा वावर व होणारे हल्ले पाहता यावर्षी या सभा विद्यालयातच आयोजित केल्या आहेत. या सहविचार सभेत १०वीच्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षेत मिळालेल्या गुणांचे वाचन केले जाते. विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काय प्रयत्न करता येतील,विषयांतील गुण वाढविण्यासाठी काय करावे आदी प्रकारचे मार्गदर्शन केले जाते.’’
यावेळी ग्राम विकास मंडळ ओतूरचे सचिव प्रदीप गाढवे, सहसचिव पंकज घोलप, मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिर्डे, भाऊसाहेब खाडे यांनी पालक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाबद्दल पालकांनी विद्यालयाचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून नक्कीच विद्यार्थी येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे यश संपादन करतील त्यासाठी आम्ही सर्व पालक सहकार्य करू, असे आश्वासन सर्व पालकांच्या वतीने कुसुम जरे, सचिन ओतूरकर, शेखर खेत्री मनोहर वामन, योगेश इंगळे, रेखा मुरादे, शबाना मुजावर, प्रकाश डुंबरे, विकास ढोबळे, सारीका शेटे, दीपक फापाळे यांनी दिले.

01038

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा भारतीय रेल्वेच्या प्रवाशांना फटका

Egg Prices Down: अंड्यांचे भाव कोसळले! 3 वर्षांतील सर्वात स्वस्त दर; ग्राहक खुश पण पोल्ट्री शेतकरी तोट्यात; कारण काय?

कोण आहे ३२ वर्षीय हरिश राणा? सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच दिली इच्छामरणाची परवानगी, १३ वर्षांपासून लाइफ सपोर्ट सिस्टिमवर

SCROLL FOR NEXT