ओतूर, ता. २७ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यामुळे आरोपीने ओतूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी दिली.
विजय हरिदास फलके असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने सोमवारी (ता. २४) ओतूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. या आरोपीस अटक करून मंगळवारी (ता. २५) न्यायालयात हजर केले असता, त्यास सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १५ मे २०२५ रोजी खामुंडी येथील फिर्यादी मारुती मनोहर कदम यांनी पती पत्नी विजय हरिदास फलके, (वय ४०), पूनम विजय फलके (वय ३४) व त्यांची अल्पवयीन मुलगी, तसेच एक अनोळखी इसम यांनी फिर्यादीवर पोस्को व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तब्बल दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व फिर्यादी यांच्याकडून दीड कोटी रुपयांचे प्रत्येकी ५० लाख रुपयांचे तीन चेक घेतले. त्यानंतर राहिलेल्या ५० लाख रुपयांची फिर्यादी यांच्याकडे वारंवार मागणी केली.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पती, पत्नी यांनी सत्र न्यायालय जुन्नर या ठिकाणी अटकपूर्व जामिन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पती, पत्नीने अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी उच्च न्यायालय मुंबई या येथे अर्ज केला. उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी या अर्जावर २० वेळा सुनावणी झाली. तरी देखील या आरोपीचा अटकपूर्व जामिन मंजूर न झाल्याने आरोपीने सोमवारी ओतूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.