पुणे

ओतूरला चैतन्य विद्यालयाचे स्नेहसंमेलन

CD

ओतूर, ता. ‌१५ : ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (ता. १३) मॅकफॉस लिमिटेड पुणेचे मॅनेजिंग डायरेक्टर अतुल डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रसिद्ध लेखक आणि कवी देवा झिंजाड यांचे ‘एक भाकर तीन चुली’ या विषयावर व्याख्यान झाल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
स्नेहसंमेलनानिमित्त विद्यालयात बुधवार (ता. ३) ते गुरुवार (ता. ११) दरम्यान क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, पर्यावरण चित्रकला प्रदर्शन आदी कार्यक्रम झाले. मान्यवरांच्या हस्ते एसएससी परीक्षा २०२५ तसेच कला, क्रीडा, विज्ञान क्षेत्रात व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समारंभाचे अध्यक्ष अतुल डुंबरे, प्राजक्ता निकम, हर्षाली मुंदडा, प्रतीक मुरादे, वैशाली होनावळे, संकेत फापाळे यांनी मनोगते व्यक्त केली. अमोल गाडे यांनी डिजिटल स्कूलसाठी डिजिटल बोर्ड भेट दिला. कार्यक्रमास ग्राम विकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, शांताराम पानसरे, रोहीदास घुले, अशोक अहिनवे, सीताराम डुंबरे, गणी मोमीन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी तर आभार संजय हिरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

Water Shortage : पिंपरी चिंचवड शहराला पाणीटंचाईच्या फेब्रुवारीतच झळा; ‘टँकर लॉबी’चे राजकारण असल्याचा नागरिकांचा आरोप

Latest Marathi News Update : काँग्रेस भवनातील गोंधळानंतर पुण्यात आज काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT