पुणे

ओतूर येथे दिवसाढवळ्या शेतकऱ्यावर हल्ल्यात

CD

ओतूर, ता. १६ : येथील रहाटी मळा येथे दिवसाढवळ्या बिबट्याने हल्ला करून पायी चाललेल्या शेतकऱ्याला जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी (ता.१६) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली.
विनोद बबन चौरे (वय ४८) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ओतूर (ता. जुन्नर) येथील राहटी मळ्यातील पाण्याची मोटार बंद करून चौरे हे पायी चालत येत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून चौरे यांना जखमी केले. बिबट्याने त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला असून त्यांच्या मांडीला चार दात लागले आहे. नंतर त्यांना तातडीने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत गोरे व डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी नारायणगाव येथे विघ्नहर हॉस्पिटलला नेण्यात आले आहे. ही घटना समजताच ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विश्वनाथ बेले व इतर कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन जखमी चौरे यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.तसेच त्यांना बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी नारायणगाव येथे नेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT