ओतूर, ता. ३० : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर शेतमजूर घेऊन चाललेल्या पिकअप व दुधाच्या टँकरची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १९ जण गंभीर जखमी तर २७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. ३०) सकाळी सव्वाआठच्या सुमारास डुंबरवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत झाला.
मंदा शिवराम हिलम (वय ३५, रा.तळेगाव ता.मुरबाड जि.ठाणे), नंदा गणेश हिलम (वय २७, रा. खुटल ता.मुरबाड, जि.ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांचे नावे आहेत. अपघाताबाबतची माहिती अशी की, मंगळवारी सकाळी आणे येथील शेतकरी बनकरफाटा येथील मंजूर अड्ड्यावरून शेती कामासाठी शेतमजूर पिकअप (क्र.एमएच १६ सीडी ८१५५) मध्ये बसून सकाळी आठच्या सुमारास अहिल्यानगर-कल्याण महामार्गाने घेऊन आळेफाट्याच्या दिशेने निघाला होता. याचवेळी मार्गावरून आळेफाटा बाजूकडून माळशेज घाटाच्या दिशेने पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज, पुण्याचा दुधाचा टँकर (क्र.एमएच १२ एक्सएम ६१२१) हा समोरून येत होता. डुंबरवाडी गावच्या हद्दीत हॉटेल अभिजित जवळ दुधाच्या टँकरची पिकअपला धडक बसल्याने पिकअप उलटल्याने यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सर्वच जखमी झाले. या अपघाताची माहिती डुंबरवाडीचे पोलिस पाटील किरण भोर यांनी ओतूर पोलिसांना दिली. ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. दाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलिस हवालदार सुरेश गेंगजे, विलास कोंढावळे, भरत सूर्यवंशी, धनराज पालवे, देविदास खेडकर, श्यामसुंदर जायभाई, ज्योतिराम पवार व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांसह जखमींना मदत केली. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्तांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलिस करत आहेत.
गंभीर जखमींची नावे
टँकर चालक संजय दादासाहेब चव्हाण (वय ४५, रा. वाठार किरोली ता.कोरेगाव जि.सातारा), वैशाली कोंढार, अंबाबाई दाभाडे, दीपाली साबळे, शुभांगी साबळे, सोनाबाई भोईर, तुळसाबाई साबळे, ताईबाई हागवणे (सर्व रा. निमगिरी, ता. जुन्नर), ढवळाबाई मुकणे, सुवर्णा धराडे, कुसुम भोईर (तिघे रा. बगाडवाडी, ता. जुन्नर), पुष्पा वाघ, मारुती वाघ, निकीता गोडे, संगीता मोडक, सुनीता कोकणे, वनिता गोडे, संजय चव्हाण, दर्शन वाघ असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
किरकोळ जखमींची नावे
कांताबाई मुंढे (वय २२), कल्याणी कुरतने (वय २०), आशा कुरवणे (वय ३५, तिघी रा. ओतूर, ता. जुन्नर), स्वाती भोईर (वय ३० रा. बल्लाळवाडी, ता. जुन्नर), कांता मवाळ (वय २०, रा. पाचघर, ता. जुन्नर), सुनीता साबळे (वय ३५), हिरा साबळे (वय ३६) , दीपाली काळे (वय ३२), अर्चना साबळे (वय २८, निमगिरी, ता. जुन्नर), जयश्री बगाड (वय ३५), मंगल भोईर (वय २०), अरुणा बगाड (वय २५), कलाबाई भोईर (वय ७०), फसाबाई गोसावी (वय ४५), योगिता भोईर (वय २७), वैशाली गोंदके (वय ३०), छाया नाडेकर (वय ३०), योगिता साबळे (वय २८, सर्व रा. बगाडवाडी, ता. जुन्नर), कल्पना उंबरे (वय २०), पारूबाई बुळे (वय ५०),नयना तळपे (वय ३०, तिघी रा. मांडावे, ता. जुन्नर), पिकअप चालक रंगनाथ गोपीनाथ गायके (वय ४५ रा. आणे, ता. जुन्नर), ताईबाई रोंगटे (वय ४५ (अकोले, जि. अहिल्यानगर), संगीता लाहमटे (वय २४, लव्हाळी, जि. अहिल्यानगर), उषा लोंढारे (वय ३५, फोपसंडी, जि. अहिल्यानगर), रेश्मा पाटील (वय २०), यमुना वाघ (वय २०, दोघी रा. टोकवडा, ता. मुरबाड, जि. ठाणे) असे किरकोळ जखमी झाले आहेत.
1233, 1234