ओतूर, ता. ३१ ः उदापूर (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीकडून बुधवारी (ता. ३१) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवून गावठाणातील रस्ते व परिसर स्वच्छ करून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये उदापूरमधील ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी व सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते. उदापूर बसस्थानकापासून ते सरस्वती विद्यालयापर्यंत स्वच्छता अभियान राबवून कचरा गोळा करून ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत संकलित केला.
स्वच्छता अभियान उद्घाटन प्रसंगी सरपंच सचिन आंबडेकर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सहखजिनदार कैलास बुगदे, तंटामुक्त अध्यक्ष बाजीराव कुलवडे, उपाध्यक्ष पांडुरंग बेळे, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तुळशीराम शिंदे, छाया चौधरी, पुष्पलता शिंदे, चैत्राली शिंदे, राजेंद्र कुलवडे, ग्रामसेवक मच्छिंद्र कवडे, शिक्षक लतीफ मोमीन, विष्णू डुंबरे, सुरेखा ढमाले, सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
01244