पुणे

जुन्नरमधील आश्रम शाळांची चित्रकला परीक्षेत बाजी

CD

ओतूर, ता. १२ ः जुन्नर तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या ग्रेड चित्रकला परीक्षेत यश संपादन केले आहे.
यासाठी ग्राम विकास प्रतिष्ठान तळेरान ही संस्था गेली चार वर्षे काम करत आहे. अध्यक्ष मोहन लांडे यांनी प्रकल्पाधिकारी घोडेगाव यांच्याकडे पाठपुरावा केला असता प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई यांनी प्रतिसाद देताना योग्य नियोजन केले व २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात सोमतवाडी, सोनावळे, अजनावळे, खटकाळे, तळेरान, खिरेश्वर व मुथाळणे या आश्रम शाळांतील एकूण २७३ विद्यार्थी श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज या परीक्षा केंद्रावर सदर परीक्षेस प्रविष्ट झाले होते.
एलिमेंटरी परीक्षेत १६७ पैकी १६३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन चार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९७.६० टक्के इतका लागला असून, इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत एकूण ११० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.
यासाठी नितीन कोकाटे, राजेंद्र गारे, समन्वयक गणेश रोकडे, सर्व आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, परीक्षा केंद्रप्रमुख विकास कोतवाल व मुख्याध्यापक जनार्दन ढोबळे यांचे महत्त्वाचे योगदान राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT