पुणे

मुथाळणे येथे तिसरा बिबट्या जेरबंद

CD

ओतूर, ता‌. १५ : मुथाळणे (ता. जुन्नर) येथे बुधवारी (ता.१४) रात्री नऊ वाजता तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आला, अशी माहिती ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे व वनपाल सचिन मोढवे यांनी दिली.
मुथाळणे येथील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या बाजूला या आधी लावलेल्या पिंजऱ्यात २१ डिसेंबर २०२५ एक नर बिबट्या १२ जानेवारी २०२६ ला ही एक बिबट्या जेरबंद केला होता. तसेच या आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याने वनविभागाने येथे परत पिंजरा लावला होता. त्यात बुधवारी रात्री नऊ वाजता बिबट्या जेरबंद झाला. तो अंदाजे पाच ते सहा वर्षांची बिबट मादी आहे.
मुथाळणे येथील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या बाजूला मागील २५ दिवसांत तीन बिबटे जेरबंद झाले असल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या परिसरात डोंगराळ भाग आणि जंगल ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे आणखी बिबटे असणार असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहे.
दरम्यान, ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सचिन मोढवे, वनरक्षक कोमल डाखोरे आणि वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन जेरबंद बिबट्याला पिंजऱ्यासह ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केले.
01330

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT