पुणे

धोलवडमधील उसाच्या शेतात आढळले बछडे

CD

ओतूर, ता. १६ : धोलवड (ता. जुन्नर) येथील नितीन कसार यांच्या शेतात सोमवारी (ता. १६) सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. ऊसतोडणीपूर्वी लावलेल्या आगीत हे बछडे किरकोळ भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी माणिकडोह निवारण केंद्रात हलवण्यात आले आहे.
शिवनेरी विद्यालयाजवळील कसार यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना कामगारांना हे बछडे दिसले. घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे व वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले.
मादी बिबट्या याच परिसरात असण्याची शक्यता असल्याने, रात्री या बछड्यांना पुन्हा त्याच ठिकाणी ठेवले जाणार आहे, जेणेकरून त्यांची आई त्यांना सोबत घेऊन जाईल. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व मजुरांनी समूहाने फिरावे आणि खबरदारी म्हणून आवाजाची साधने वापरावीत, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

1529

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT