पुणे

ओतूर येथे विविध कार्यक्रम

CD

ओतूर, ता. २३ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळमळा येथे छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती सोहळा आणि शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी शिवरायांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शौर्य आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित प्रभावी भाषण करून उपस्थितांना प्रेरित केले. त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी कोळमळा आणि प्राथमिक शाळेतील बालचमूंनी देशभक्तिपर गीते, नृत्य, शाळा, कोळमळा नाटिका आणि शिवचरित्रावर आधारित सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोमल डोके, उपाध्यक्ष राजेंद्र बटवाल, सदस्य पांडुरंग थोरात, संगीता सूर्यवंशी, पुनम बटवाल, ग्रामपंचायत सदस्य वनिता बटवाल, तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मंदा हाडवळे आणि शिक्षक सखाराम वाळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhaskar Jadhav: 'कुठेतरी घातपात झालाय, असंच वाटतंय'! अजितदादांच्या विमान अपघातावर भास्कर जाधव महत्वाचे बोलले

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत बंद! मात्र IDFC First Bank आणि TCS ला मोठा धक्का; कोणते शेअर्स तेजीत?

Crime: भयंकर! फक्त ३० सेकंद, २७ वेळा चाकूने वार अन्...; अल्पवयीन तरुणांचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत क्रूर कृत्य, कारण काय?

Malegaon News : मालेगावचा पाणी अहवाल समोर! वर्षभरात २ हजार नमुन्यांची तपासणी, ८२ ठिकाणी आढळले दूषित पाणी

Latest Marathi News Live Update : लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT