ओतूर, ता. २१ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालयामध्ये मोबाईलचा अतिवापर व विविध प्रकारची व्यसने यांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावे, याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. आळेफाटा येथील सुमन व्यसनमुक्ती व मानसिक आजार उपचार केंद्राचे ऋषी साबळे व आदित्य डोईजड यांनी हे व्याख्यान दिल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
मार्गदर्शन करताना आदित्य डोईजड व ऋषी साबळे म्हणाले की, ‘‘मोबाईलचा अतिवापर व विविध व्यसने केल्यामुळे मेंदू व मनावर वाईट परिणाम होतात. मनोविकृती निर्माण होते. मोबाईलमुळे माणसे एकमेकांपासून दूर गेली आहेत. अफू, गांजा, फुलचंद पान, स्टिंग यासारखे शीतपेय आदींचे व्यसन विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लागले आहे. आजकाल लहान मुलांना जेवतानासुद्धा हातात मोबाईल द्यावा लागतो. याची सवय लागते आणि या सवयींचे व्यसनांत रूपांतर होते. यासाठी पालकही जबाबदार आहेत. व्यसनांमुळे चिडचिड होणे, हृदयाचे विकार यांपासून ते कॅन्सरसारखे महाभयंकर आजार होत आहेत. विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहेत. या सर्व संकटांपासून मार्ग काढायचा असेल तर वेळेनुसार व गरजेनुसार मोबाईलचा वापर करा. विविध मैदानी खेळ खेळा. आईवडिलांशी गप्पा मारा. पुस्तकांचे वाचन करा. स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ द्या.’’
या प्रसंगी ग्रामविकास मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप, राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिरडे, भाऊसाहेब खाडे, राजाराम शिंदे, विजया गडगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित डांगे यांनी केले. अमित झरेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.