पुणे

मांडवी नदीच्या सौंदर्याला प्रदूषणाचा शाप

CD

हिरवा थर, तरंगणारा कचरा आणि दुर्गंधीचा विळखा : ग्रामस्थांकडून संताप व्यक्त

ओतूर, ता. २४ : ओतूर (ता.जुन्नर) येथील मांडवी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीच्या पात्रावर पसरलेला हिरवट थर, सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा आणि दुर्गंधीमुळे नदीचे नैसर्गिक सौंदर्य लोप पावत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी, ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

मांडवी नदीचा उगम कोपरे मांडवे मुथाळणे खोऱ्यात असला तरी या नदीवर चिल्हेवाडी हे धरण आहे. तेथून पुढे
चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण, रोहोकडी, ओतूर व पुढे ठिकेकरवाडी आणि इतर गावे आहे. चिल्हेवाडी धरणातून मांडवी नदी पाणी सोडले गेले नसल्यामुळे तसेच नदी किनाराच्या गावांचे वाढते शहरीकरण आणि त्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळले जात असल्याने पाण्याचा रंग बदलला आहे. तसेच पाण्यावर जलवनस्पती फोफावत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घरगुती सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा, शेतीतील कचरा तसेच बांधकामातील अवशेष नदीत टाकले जात आहेत. याचा थेट परिणाम जलचरांवर होत. यामुळे नदीतील मासे व इतर जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पाण्याचा वापर करताना अडचणी येत आहेत. प्रदूषित पाण्यामुळे त्वचारोग व पोटाचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ओतूर शहराचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू असून ही नदी प्रदूषित होत आहे.

नदी स्वच्छता मोहिमा राबविण्याची मागणी
सांडपाणी प्रक्रिया केंद्रे इतर गावांमध्ये सुरू व्हावी तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदीत कचरा टाकण्यावर कडक कारवाई तसेच नदीच्या कडेला कचरा टाकू नये याबाबत सूचना फलक, नदीतील जलचर जीवन अबाधित राहावे म्हणून नियमित नदी स्वच्छता मोहिमा राबविणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून वातावरणाची जीवनरेषा आहेत. फक्त मांडवी नदीच नाही तर जुन्नर तालुक्यातील सर्वच नद्यांची अशीच अवस्था आहे. जलपर्णी, शेवाळ व प्लॅस्टिक कचरा मुक्त नद्या हा उपक्रम मोठ्या प्रमाणात प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन राबवणे गरजेचे आहे.


01602

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT