पुणे

ओतूर येथे प्रभातफेरीद्वारे लेखक, शास्त्रज्ञांना वंदन

CD

ओतूर, ता. ९ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका सीमा डुंबरे यांनी दिली. या वेळी मराठी साहित्यिक आणि शास्त्रज्ञांचे फ्लेक्स हातात घेऊन गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर पहिली ते चौथीच्या मुलांनी विविध प्रयोग करून या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन चैतन्य मेडिकलचे मीनल व भास्कर डुंबरे यांनी केले. चिमुकल्या मुलांनी केलेले हे प्रयोग पाहून सर्व मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर जिल्हा ते केंद्र स्तरापर्यंतच्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थांना बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणपतराव डुंबरे, दंतवैद्य डॉ. अमोल चौधरी, जिल्हा परिषद सदस्य डॉ. छायाताई तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे, ट्रॉफीच्या सौजन्य असणाऱ्या सुवर्णा बरबडे, लक्ष्मण फापाळे हे उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. अमोल चौधरी यांनी शाळेसाठी दहा हजाराची साऊंड सिस्टिम दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता जाधव यांनी केले. तर, योगिता बुट्टे यांनी आभार मांडले. कार्यक्रम यशस्वितेसाठी माधुरी शेटे, सतीश नलावडे, सुदेष्णा गाढवे, उषा भवारी, ज्योती शिरसाठ, रूपाली गायकर, संगीता ढाकणे यांनी प्रयत्न केले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन डुंबरे, सदस्य नितीन पानसरे, कविता डुंबरे, पूजा दिवेकर, प्रतीक्षा ढोकळे, विद्या हाडवळे, जितेंद्र घुले, डॉ. योगेश गायकर, प्रेरणा तांबे यांनी मुलांच्या प्रयोगाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT