पुणे

खामुंडी येथे शेतात आढळला आजारी बिबट्या

CD

ओतूर, ता. १ : खामुंडी (ता. जुन्नर) येथील बदगी-बेलापूर रस्त्यालगत रविवारी (ता. १) सकाळी सुभाष बोडके यांच्या मिरचीच्या शेताच्या बांधावर आजारी अवस्थेतील अंदाजे २ वर्षे वयाची मादी बिबट आढळून आल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली. दरम्यान, सकाळीच सोशल मीडियावर आजारी बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ही आजारी मादी आढळून आली. याबाबतची माहिती ओतूर वनविभागाला समजल्यावर ओतूरचे वनक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले व बिबट रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी महेंद्र ढोरे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी महेंद्र ढोरे यांच्या पथकानी बिबट्याची पाहणी करून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे. प्रथम दर्शनी उपासमारी मुळे सदर बिबट अशक्त होऊन आजारी पडला असल्याचे किंवा त्याला अन्नातून विषबाधा झाली असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: महिलांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’, यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; वापर कसा करायचा?

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांखलीम येथे सामुदायिक शेती प्रकल्पाचे उद्घाटन केले

SCROLL FOR NEXT