ओतूर, ता. ८ : उबेर चालकाचा खून करणाऱ्या आरोपीस ओतूर (ता. जुन्नर) पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी दिली.
नासीर अहम्मद सलामतुल्ला अन्सारी (वय २६ मूळ रा. शेरकोट, ता. धामपूर, जि. बिजनोर, राज्य-उत्तर प्रदेश, सध्या रा. सेक्टर नं. १, ऐरोली नाका, गणेश बारजवळ, नवी मुंबई, जि. ठाणे) यांचा खून झाला आहे. याबाबत मयताचा भाऊ गोहम्मद अमिर सलामतुल्ला अन्सारी यांनी फिर्याद दिली होती. तर आदर्श चंद्रकांत भालेराव (वय २१, रा. संकेश्वर किस्टल सोसायटी, गणेश विद्यालयाजवळ, टिटवाळा ईस्ट, ता. कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार (ता. ५) ते शनिवार (ता. ७) दरम्यान सितेवाडी गावच्या हद्दीत गणेशखिंड घाटामध्ये
पांढऱ्या रंगाची ईर्टीगा मोटार (क्र. एमएच ०३ डीव्ही ६४०३) यावरील चालक नासीर यांचा अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याबाबतची फिर्याद ओतूर पोलिसात रविवारी (ता. ८) दाखल केली. ओतूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू केला असता मोटारीबाबत उबेर कंपनीकडे माहिती काढली. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास आरोपी आदर्शने टिटवाळा ते जुन्नर अशी बुकिंग केली असल्याची माहिती मिळाली. या मोटारीचे जीपीएस तपासले असता मोटार जुन्नर या ठिकाणी न जाता अन्सारीचा मृतदेह ज्या ठिकाणी मिळून आला त्या गणेश खिंडीत मिळून आले. तसेच त्या ठिकाणापासून काही अंतरावर जाऊन पुन्हा पाठीमागे येत टिटवाळा या ठिकाणी थांबली असल्याचे निष्पन्न झाले. तर मोटार बेवारस मिळून आल्यानंतर त्यात रक्ताचे डाग मिळून आले. स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी तपास केला असता हा खून आदर्शने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीणचे संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ओतूरचे सहायक निरीक्षक एल. जी. थाटे, उपनिरीक्षक संदीप आमणे, पोलिस हवालदार नरेंद्र गोराणे, नामदेव बांबळे, बाळशिराम भवारी, देविदास खेडकर, भरत सूर्यवंशी, रोहीत बोंबले यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.