पुणे

ओतूर येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

CD

ओतूर, ता. १० ः ओतूर (ता. जुन्नर) येथील स्व. वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान यांच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून युनेस्कोचा जागतिक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेविका वर्षाताई देशपांडे या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ओतूर नगरीतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत कार्य करणाऱ्या महिलांचा शिवजन्मभूमीची शिवकन्या हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी प्रियांका पानसरे, सहाय्यक राज्यकर आयुक्त मीनल पोटे, राज्य निबंधक बार्टी इंदिरा आस्वार डावरे, वन परिक्षेत्र अधिकारी स्वाती डुंबरे, कृषी उपसंचालक ऋतुजा डुंबरे, भूमी अभिलेख विभाग नाशिक भूकरमापक निकिता घोलप, तसेच शिवजन्मभूमीतील पहिली आंतरराष्ट्रीय वैमानिक कॅप्टन अक्षता डुंबरे, व १० हजार बाळंतपण करणारी आदर्श सुईण शांताबाई जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी बोलताना पुरस्कारर्थी महिलांनी प्रतिष्ठानचा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमच कौतुक केले. तसेच, उपस्थित मान्यवरांनी स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठानचे वर्षभरातील राबवलेल्या सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी प्रतिष्ठानमार्फत शिवजन्मभूमित पहिल्यांदाच एकही इलेक्ट्रॉनिक वाद्य न घेता ४० पारंपरिक वाद्य घेऊन साकारलेला अविस्मरणीय शिवसोहळा फोक शिव आख्यान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे व शोभाताई तांबे यांनी केले.

01694

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

Pune News : भाजपच्या आणखी दोन नगरसेविकांमधील वाद चव्हाट्यावर; शहरातील नेत्यांचे दुर्लक्ष

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

SCROLL FOR NEXT