पुणे

कांदा उत्पादकांपुढे बँकांचा तगादा

CD

ओतूर, ता. १२ : जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात कांदा काढणीला वेग आला असून, आखाती देशांतील युद्ध आणि निर्यात धोरणामुळे बाजारभाव ८ ते १० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मार्च अखेर असल्याने बँका आणि पतसंस्थांनी कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकावा लागत आहे. काही शेतकरी दरवाढीच्या आशेने कांदा चाळीत साठवत आहेत, मात्र भविष्यातील दराबाबत अनिश्चितता आहे. ओतूरसह उदापूर, डिंगोरे, कोळवाडी आणि पिंपळगाव जोगा भागात सध्या काढणीची लगबग सुरू आहे
यावर्षी मजुरीचे दर वाढले असले तरी, मध्य प्रदेशातील मजुरांच्या आगमनामुळे स्थानिक मजुरी काहीशी नियंत्रणात आली आहे. एकरी १५ ते १६ हजार रुपये दराने हे मजूर काम करत आहेत. नाफेडने तातडीने २५ ते ३० रुपये दराने खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

खते, औषधे आणि मजुरीचा खर्च पाहता सध्याचा दर परवडणारा नाही. सरकारने ओल्या कांद्याला २५ रुपये आणि साठवणूक केलेल्या कांद्याला ५० रुपये हमीभाव द्यावा.
- विनायक शिंदे, शेतकरी

01698

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT