पुणे

ओतूर परिसरात गॅस सिलिंडरचा तुटवडा

CD

ओतूर, ता. २१ : जुन्नर तालुक्यातील ओतूर व माळशेज पट्ट्यातील ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. दोन सिलिंडरच्या नोंदणीतील अंतर ४५ दिवस केल्याने इंधनाचे संकट उभे राहिले असून, पर्याय म्हणून गृहिणींना पुन्हा चुली पेटवाव्या लागत आहेत.
ग्रामीण भागात एकेकाळी ''धूरमुक्त स्वयंपाकघर'' मोहिमेमुळे उज्ज्वला गॅस योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांनी ग्रामीण भागासाठी दोन सिलिंडरमधील अंतर ४५ दिवस केल्याने ग्राहकांची अडचण झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने एक सिलिंडर साधारण २० ते २५ दिवसच पुरतो. उर्वरित दिवसांच्या इंधनाचा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. तसेच लग्नसोहळे, धार्मिक विधी आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी गॅस उपलब्ध होत नसल्याने पुन्हा लाकूडफाटा आणि जंगलतोडीचा धोका वाढला आहे.

गॅस कंपन्यांकडून ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव केला जात आहे. शहरात २५ दिवसांनी सिलिंडर मिळतो, मग ग्रामीण भागावर ४५ दिवसांच्या अंतराची सक्ती अन्यायकारक आहे. या धोरणामुळे वृक्षतोड वाढून पर्यावरणाची हानी होत आहे. कंपन्यांनी ग्रामीण भागातही २५ दिवसांच्या अंतराने गॅस पुरवठा करावा.
- तानाजी तांबे, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT