पराग जगताप ः सकाळ वृत्तसेवा
ओतूर, ता. १८ : ओतूर (ता. जुन्नर) येथे दर गुरुवारी भरत असलेल्या आठवडे बाजारात परिसरातील १० ते १५ गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. मात्र, बाजारपेठेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक व विक्रेत्यांची मोठी गैरसोय होत आहे. ओतूर ग्रामपंचायतीकडून आठवडे बाजारातील विक्रेत्यांकडून नाममात्र शुल्क आकारले जात असले, तरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुख्य समस्या
भाजीपाला व इतर वस्तू विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी ओटे, तसेच सुरक्षित शेडची व्यवस्था नाही.
बाजार परिसरात लाइट किंवा पुरेशा प्रकाशाची सोय नाही.
पावसाळ्यात बाजार परिसरात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचत असल्याने विक्रेते व ग्राहकांचे मोठे हाल होतात.
आठवडे बाजाराच्या दिवशी वाहनतळाची मोठी समस्या निर्माण होत.
स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही.
नियोजनाअभावी जुने बसस्थानक ते ग्रामवेशीदरम्यान तसेच पांढरी मारुती चौक परिसरात वाहतूक कोंडी होते.
विक्रेते रस्त्याच्या कडेला दुकाने लावतात, त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण होते.
वाहनांसाठी स्वतंत्र जागा नसल्याने वाहने जागा मिळेल तेथे उभी केली जातात.
प्रसाधनगृह व पाणीपुरवठ्याचा प्रश्न
महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही.
पुरुषांसाठी असलेले प्रसाधनगृह अस्वच्छ.
सार्वजनिक शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.
स्वच्छता होते; पण इतर बाबींकडे दुर्लक्ष
ग्रामपंचायतीकडून आठवडे बाजारानंतर परिसरातील ओला व सुका कचरा उचलून स्वच्छता केली जाते.
प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असतानाही त्यावर कारवाई होताना दिसत नाही.
वजन काट्यांची तपासणी, तसेच खाद्यपदार्थांच्या शुद्धतेची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही.
ओतूरचा गुरुवारी भरणारा आठवडे बाजार हा शहरातील एका विशिष्ट जागेत न भरता सर्वत्र रस्त्याच्या कडेने भरत असल्याने सुविधा उपलब्ध करून देताना अडचणी येत आहे. व्यावसायिकांना बाजार तळावर ओटे बांधून देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ओटे बांधता येत नाहीत. तसेच, महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहासाठीही जागेचीच अडचण आहे. प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातलेली आहे. तसेच, बाजार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नियमित सर्व कचरा ग्रामपंचायतचे सफाई कामगार उचलून घेतात.
- बाळासाहेब वनघरे, ग्रामविकास विकास अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.