पुणे

ओतूरला उद्यापासून सत्यशोधक अधिवेशन

CD

ओतूर, ता. १९ : महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त ओतूर (ता. जुन्नर) येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय राज्यव्यापी सत्यशोधक अधिवेशन होणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता या अधिवेशनाचे उद्‌घाटन होणार असून, या सोहळ्यास खासदार शाहू महाराज, तसेच छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ओतूर येथील सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ ओतूर यांच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात फुले विचार, शिक्षण, स्त्री-समता आणि शेतकरी प्रश्न आदी विषयांवर विविध कार्यक्रम, व्याख्याने आणि चर्चासत्रे या माध्यमातून सखोल मंथन करण्यात येणार आहे. याच बरोबर या अधिवेशनात लघुपट, नाटक, लघु नाटिका आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘फुले आणि आजच्या शिक्षणाची दशा व दिशा’ हा परिसंवाद होणार आहे. त्यात प्रा. डॉ. उमेश बगाडे, प्रा. डॉ. शरद बाविस्कर, प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर, किशोर दरक आणि प्रा. डॉ. सुधाकर शेलार सहभागी होणार आहेत. दुपारच्या सत्रात माजी साहित्य संमेलन अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘फुले आणि महिला सक्षमीकरण : समानतेचा नवा संघर्ष’ या विषयावर चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी ‘फुले आणि वर्तमानातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ हा परिसंवाद होईल. त्यात डॉ. अजित नवले, राजू शेट्टी, अविनाश पाटील, अरविंद खैरनार, विवेकानंद पाटील आदी सहभागी होणार आहेत. तसेच, ‘महाराष्ट्रधर्म : मुक्त चिंतन’ या परिसंवादात संजय आवटे, डॉ. दीपक पवार, मा. रा. लामखडे आदी सहभागी होणार आहेत.

पुतळ्यांचे अनावरण होणार
ओतूर येथील भाऊ कोंडाजी डुंबरे हे महात्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते. फुले दाम्पत्याने स्थापन केलेल्या मुलींच्या शाळांतील चौथी शाळा ओतूर येथे होती. सावित्रीबाई फुले यांनी ओतूर येथे काही काळ वास्तव्य करून दुष्काळग्रस्तांसाठी काम केले होते. त्यांची स्मृती म्हणून येथील मुलींच्या शाळेत म. फुले, सावित्रीबाई आणि भाऊ कोंडाजी डुंबरे यांचे अर्धपुतळे उभारण्यात आले आहेत. त्यांचे अनावरण या अधिवेशनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दादर रेल्वे स्थानकाचं नाव तेच राहणार'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर; पण, 'चैत्यभूमी' नावाच्या चर्चेवर म्हणाले...

Gondia Murder Case : पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच दिली १३ लाखांची सुपारी! २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी उलगडला गोंदियातील वर्षा तुरकर हत्याकांडाचा थरार

IND vs NZ : भारताविरुद्ध शतक झळकावत हेन्री निकोल्सने रचला विक्रम; विल्यमसन-क्रोची केली बरोबरी

Marathi News Live Updates : स्वीकृत सदस्य निवडीसाठी अर्ज करण्यास दोन दिवस बाकी

Mahabaleshwar Water Crisis: महाबळेश्वरला कृत्रिम पाणीटंचाई! ऐन पर्यटन हंगामात पाण्यासाठी वणवण; प्राधिकरण-पालिकेत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT