पुणे

ओझर परिसरातील उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात

CD

ओझर, ता.१० येथील (ता. जुन्नर) परिसरातील शेत शिवारात उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात आली आहे. हिरवीगार पिके सध्या डोलू लागली आहेत. त्यामुळे पाखरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेताच्या बांधावर उभा राहून पहारा देत आहे. काही ठिकाणी शेताच्या मध्यभागी मचाण करण्यात आली आहेत.
चिकात आलेल्या बाजरी पिकाला पक्षी मोठ्या प्रमाणावर उपद्रव करतात. त्यांना हुसकावण्यासाठी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर करून, आवाज करणारा चाबूक तसेच चमकदार पट्ट्यांचा वापर शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

उन्हाळी बाजरी पिकातून धान्याचे उत्पादन चांगले मिळत असून भावही चांगला मिळतो. जनावरांना उत्तम प्रतीचा चाराही उपलब्ध होतो. परिसरातील आदिवासी भागातील शेतकरी मोठ्या जमीनदारांकडे अर्ध्या किंवा तिसऱ्या वाट्याने बाजरीची शेती करतात. त्या माध्यमातून त्यांना वर्षभरासाठीचे धान्य उपलब्ध होते. बाजरीच्या पिकाला पाणी देखील कमी लागते. तसेच भांडवली खर्च कमी येत असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा बाजरी पिकाकडे वाढता कल असल्याचे पहावयास मिळते.

00931

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! खडकवासला धरण ८१% भरले; कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात

'वडील मुख्यमंत्री आहेत म्हणून याला…', टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...

Konkan Pune Highway : कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला! ताम्हिणी, भोर अन् आंबेनळी घाट बंद झाल्याने चाकरमान्यांवर मोठे संकट; शेकडो किलोमीटरचा मारावा लागणार वळसा!

Krishna River Flood : कोल्हापूर-सांगलीत मुसळधार! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती; पाहा यंदाचा पहिला 'दक्षिण द्वार सोहळा', भाविकांची अलोट गर्दी

IND vs ENG, 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचा फलंदाजी क्रमांक बदलणार, तर बिश्नोई संघातून आऊट? कशी असू शकते भारताची प्लेइंग-११

SCROLL FOR NEXT