पुणे

शिरोली येथे मोटारीतून बाजरी पिकाची राखण

CD

ओझर, ता.६ : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील एका बाजरीच्या शेतावरील राखणदार आदिवासी बांधव चक्क चारचाकीतून येऊन पक्ष्यांपासून पिकाचे राखण करत आहे. त्याच्याशी चर्चा करून माहिती घेतली असता शेतीकामाची आवड आणि वर्षभरासाठीचे धान्य मिळविण्यासाठी आपण हे काम करत असल्याचे त्याने सांगितले. मोटारीमुळे बिबट्यापासूनही संरक्षण होण्यास मदत होते.

जुन्नर तालुक्यात उन्हाळी बाजरीच्या काढणीचा हंगाम जवळपास संपत आला आहे. परंतु उशिराने पेरणी केलेली बाजरीची पिके अजूनही शेतात डोलताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील कुटुंब मोठ्या प्रमाणावर बाजरीच्या राखणदारीचे काम करतात.

दरम्यान, जुन्नर तालुक्यात बिबट्याचा उपद्रव वाढला असून बिबट्याच्या हल्ल्यात काही आदिवासी राखणदारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांचे शेतातच वास्तव्य करून राखण करणे धोकादायक असल्याने ते स्वतःच्या घरून जाऊन येऊनच राखणदारीचे काम करतात. शेतकऱ्यांकडून अर्ध्या किंवा तिसऱ्या वाट्याने बाजरीचे राखण घेऊन वर्षभराचा कुटुंबाचा धान्याचा प्रश्न मार्गी लावतात.

01215

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: संजय राऊतांना घरात घुसून मारू, शिंदेसेनेच्या आमदारांची थेट धमकी; राजकारणात वाद पेटणार

'द ट्रायल 2' मध्ये काजोलचा ऑनस्क्रीन नवऱ्यासोबत लिपलॉक, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मोडली 'नो किसिंग पॉलिसी'

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून अपहरण आणि ठार मारण्याचा प्रयत्न

Bhum News : सई खामकर हिचे 'रंगोत्सव सेलिब्रेशन' राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

"माझी कॅमेराच्या जगातली पहिली मैत्रीण. " मालिकेचा निरोप घेताना ऐश्वर्या नारकरांच्या भावी सुनेची भावूक पोस्ट

SCROLL FOR NEXT