पुणे

‘मराठी माणूस एकत्र आल्यास बाळासाहेबांना खरी मानवंदना’

CD

ओझर : ‘‘महाराष्ट्रातील समस्त मराठी माणूस जर गटतट बाजूला ठेऊन एकत्र येऊन दिल्लीत बसलेल्या गुजराती व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला, तर हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना खरी मानवंदना ठरेल,’’ असे मत खासदार संजय राऊत यांनी ओझर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र कधी येतील, या पत्रकारांच्या प्रश्नावरही त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचे आदेश दिल्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्यासाठी दौरे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित मिळून लढण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.
छगन भुजबळ यांना मिळालेल्या मंत्रीपदाबाबत ते म्हणाले, ‘‘भुजबळ हे अजित पवार यांनी चोरलेल्या पक्षात आहेत. मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले आहे. भाजपशी सोयरीक केलेला नेता कालांतराने सरपटणारा प्राणी होतील. गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून भाजप एका राज्यात चार मुख्यमंत्री देखील करू शकतात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT