पुणे

कुमशेतमधील पिंजऱ्यांत बिबट्या अडकेना

CD

ओझर, ता. ४ : जुन्नर तालुक्यातील बिबट्या कुमशेत फाट्याजवळ शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी रस्त्याच्या कडेला जवळ पास दीड ते दोन तास दबा धरून हल्ला करण्याच्या पावित्र्यात बसल्याचे अनेकांनी पाहिले. एका दुचाकीवर झडप घालण्याचा त्याने प्रयत्नही केला, परंतु रस्त्याने मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनामुळे दुर्घटना टळली, अशी माहिती पोलिस पाटील मंगेश डोके यांनी दिली.
याबाबत कुमशेतचे सरपंच रवींद्र डोके यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगिल्यावर वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हल्ला करणारा बिबट्या नरभक्षक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
कुमशेत येथे आठ दिवसांपूर्वी बिबट्याने एका चिमुकल्याचा जीव घेतला होता. त्यानंतर वनविभागाने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले. त्यामध्ये एक नर बिबट्या जेरबंद झाला होता. परंतु, आणखी काही बिबटे तेथे वावरत असल्याने वनविभागाचे अजूनही नऊ पिंजरे तेथे आहेत, परंतु बिबट्या त्यामध्ये अडकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT