ओझर, ता. २० ः जुन्नरच्या पूर्व प्रवेशद्वारापासून बेल्हे- जेजुरी रस्त्याला जोडणाऱ्या इपीसी ५६ या रस्त्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. परंतु, स्थानिक नागरिक व प्रवाशांना या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. मार्गाच्या बाजूला केलेल्या साइडपट्ट्यांमुळे वाहने खचत आहेत.
हा मार्ग सिमेंट काँक्रिटचा असून, रस्त्याच्या कामासाठी शासनाने सुमारे ३१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
संबंधित ठेकेदाराकडून नागरिकांच्या सुरक्षेविषयी दक्षता घेतली जात नाही. धोक्याच्या ठिकाणी, तसेच वळण रस्त्याला फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण करून अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या व्यवस्थित भरलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी माती मिश्रित मुरूम वापरला आहे. साइडपट्टीवर पाणी मारून त्या पुरेशा दाबलेल्या नसल्याने पोकळ मुरूमात वाहने खचतात. तसेच, रस्त्याला पुरेशी रुंदी नसल्यामुळे मोठी दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होते. अनेकवेळा ठेकेदाराचीच वाहने चुकीच्या पद्धतीने उभी असतात. वाहने विरुद्ध दिशेने चालविल्याने रस्ता बंद होतो. शिवाय ठेकेदाराचे कामावर असलेले परप्रांतीय कर्मचारी नागरिकां सोबत अरेरावीची भाषा वापरतात.
दिशादर्शक फलक न लावल्यामुळे प्रवाशांना वाहने पुन्हा मागे फिरवून मार्ग बदलून न्यावी लागतात. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होते. तसेच, वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी मारले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी नागरिक संपर्क साधून तक्रारी करत आहेत. परंतु, नागरिकांच्या तक्रारीची प्रशासनाकडूनही गांभीर्याने दखल घेतली जात नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निखिल उतळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी माहिती घेऊन चौकशी करतो.
01785
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.