पुणे

कत्तलीच्या जनावरांची पाबळमध्ये सुटका

CD

पाबळ, ता. ३ : पिकअप वाहनामधून दाटीवाटीने कोंबून चालविलेल्या सात जनावरांची बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे पाबळ (ता. शिरूर) येथून सुटका झाली. हे गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला.
पाबळ येथील केंदूर रस्त्याने पिकअपमधून काही जनावरे कत्तलीसाठी जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनतर ऋषिकेश नऱ्हे, कुणाल थिटे, दिनेश झोडगे, पियुष चौधरी, जितेंद्र जाधव हे पाबळ गावात थांबलेले असताना त्यांना पिकअपमध्ये (क्र. एमएच १४ जेएल २९१५) सात जनावरे दाटीवाटीने बांधून घेऊन चालल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पिकअपसह चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत ऋषिकेश श्यामराव नऱ्हे (वय २३, रा. नऱ्हे बेंद, पाबळ) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी प्रकाश धोंडीबा गावडे (वय ३३, रा. थूगाव, ता. आंबेगाव) आणि इनामअली हसनअली इनामदार (वय ५४, रा. मंचर) या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT