दिल्लीच्या प्रश्नांची गल्लीत चर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु, तो अधिकार गाजवण्यापूर्वी संविधानाने सांगितलेले मतदान कर्तव्य बजावलेच पाहिजे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्येक नवयुवकाच्या प्रयत्नातून व आकांक्षातून साकार होणार आहे. त्यासाठी आपल्या स्वप्नांना आकार देणारा उमेदवार निवडला जावा, म्हणून मी मतदानात सहभागी होत आहे. तुम्हीही नक्की मतदान करून आपल्या कर्तव्याची पूर्ती करा म्हणजे अधिकारवाणीने लोकशाहीवर गप्पा मारता येतील.
- ओंकार डहाळे, मलठण, (ता.शिरूर)
मी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करण्यासाठी अत्यंत उत्सुकता आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येकाने सहभागी व्हायलाच हवे. विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर, हे मतदानरुपी पहिले पाऊल प्रत्येकाने टाकायला हवे, हे मात्र निश्चित. देश सशक्त व विकसित बनवायचा असेल तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गाव व प्रत्येक मतदारसंघ हे विकसित झाले पाहिजे. त्यासाठी आपल्या मतदारसंघाचा दूर दृष्टीकोनाने विकास केलेला व विकासाचे ध्येय समोर ठेवलेला उमेदवार निवडण्यासाठी मी मतदानरुपी सहभाग नोंदवणार आहे. चला तर तुम्हीही सहभागी व्हा!
- शिवप्रसाद बागडे, मलठण, (ता. शिरूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.