पुणे

सविंदण्यातील तिघांवर तोडफोडप्रकरणी गुन्हा

CD

कवठे येमाई, ता. १३ : सविंदणे (ता. शिरूर) येथील विहिरीवरील विद्युत पंप, पाइपलाइन व अन्य साहित्याची तोडफोड करून जाळून टाकल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान घडली.
विठ्ठल गेणुजी ढगे हे मांदळवाडी (ता. आंबेगाव) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे त्यांनी सविंदणे (ता. शिरूर) येथे शेतजमीन खरेदी करून विहीर खोदली आहे. मात्र, या विहिरीवरील विद्युत पंप, केबल व इतर साहित्याची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची तक्रार दत्तात्रेय जयसिंग बोऱ्हाडे या शेतमजुराने ३० जानेवारी रोजी टाकळी हाजी पोलिस दुरक्षेत्रात दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर १९ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा तोडफोड झाल्याचे आढळून आले. त्यानंतर विठ्ठल ढगे यांनी परिसरातील काही व्यक्तींशी चर्चा केली असता गणेश रामा पोखरकर याने वसंत गहिना पडवळ व चेतन वसंत पडवळ (रा. सविंदणे) यांच्या सांगण्यावरून ही तोडफोड केल्याचे संबंधित व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर ढगे यांना सांगितले. याबाबत ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला. मांदळवाडी येथील खाणकामास विरोध केल्यामुळे राग मनात धरून ही तोडफोड करण्यात आल्याचेही ढगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणा

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT