पुणे

कवठे येमाई यात्रेत तरुणावर रॉडने हल्ला

CD

कवठे येमाई, ता. १३ : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे यात्रेदरम्यान जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. १२) घडली. याबाबत संतोष बबन भाईक (वय २४, रा.कवठे येमाई) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई (ता. शिरूर) येथे श्री येमाई देवीची पालखी मिरवणूक सुरू असताना संतोष भाईक व त्याचे मित्र उज्वल मुंजाळ, अरविंद तिकोळे, रामदास मुंजाळ आणि भाऊ योगेश भाईक हे पालखीत सहभागी झाले होते. त्यावेळी संतोष ताशा वाजवत असताना संभाजी विष्णू भाईक याने मागील भांडणाचा राग मनात ठेवून लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर व मानेवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याला दुखापत झाली. याबाबत संतोष यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संभाजी याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उबाळे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT